बिग बींच्या घरातील अनधिकृत बांधकाम पालिकेकडून नियमित
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2018 11:34 AM (IST)
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम बीएमसीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नियमित केलं
मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेकडून नियमित करण्यात आलं आहे. माहितीच्या कायद्याअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम बीएमसीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नियमित केलं, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवली आहे. काहीच दिवसांपूर्वी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील 'रामायण' बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हातोडा चालवला होता.