मुंबई: क्रिकेटच्या मैदानावर नृत्य आणि त्यानंतर आपल्या गायनानं चाहत्यांची मनं जिंकणारा ड्वेन ब्राव्हो आता बॉलिवूडमध्ये एका नव्या इनिंगला सुरुवात करतो आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हांच्या 'तुम बिन टू' या आगामी चित्रपटात ब्राव्होच्या आवाजातलं गाणं आपल्याला ऐकायला मिळणार आहे.


 

हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी ब्राव्हो गेल्या आठवड्यात मुंबईत आला होता. सुरुवातीला या गाण्याचे शब्द समजून घेण्यात ब्राव्होला अडचण झाली. हिंदी गाण्याच्या ओळीही त्याच्या लक्षात राहत नव्हत्या. पण सगळ्यांनीच आपल्याला मदत केल्यामुळं आपण व्यवस्थित गाऊ शकलो, असं ब्राव्होनं सांगितलं.

 

अभिनेता म्हणून संधी मिळाली, तर आपल्याला दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफसोबत काम करायला आवडेल, असंही ब्राव्हो म्हणाला.