मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार चांगला अभिनेता तर आहेच, पण तो उत्तम पती आणि वडीलही आहे. याचा पुरावा म्हणजे अक्षयचा नवा टॅटू. अक्षयने नुकताच पत्नी ट्विंकलच्या नावाचा टॅटू केला आहे.


अक्षयने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत अक्षयच्या खांद्यावर टिना नाव कोरल्याचं दिसत आहे. टिना हे ट्विंटकलचं टोपण नाव आहे.


टॅटू करण्याची अक्षय कुमारची ही पहिली वेळ नाही. याआधी अक्षयने त्याच्या दोन्ही मुलांच्या नावाचे म्हणजेच आरव आणि निताराचे टॅटू केले आहेत.



अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी जॉली एलएलबी 2 या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षी 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत आहे.