Bhool Bhulaiyaa 3 vs Singham Again Ban : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. याचं दिवशी कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर होणार आहे. दोन्ही मल्टीस्टारर सिनेमे एकमेकांना भिडण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच दोघांनाही धक्का बसला आहे. हे दोन्ही चित्रपट एका देशात बॅन करण्यात आले आहेत.
रिलीजआधीच सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 ला झटका
सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होण्याआधीच त्यावर सौदी अरेबियामध्ये बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये हे दोन्ही चित्रपट बॅन करण्यात आले आहेत. यामुळे दोन्ही चित्रपटांना रिलीज आधीच मोठा फटका बसला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सौदी अरेबिया देशात भूल भुलैया 3 आणि सिंघम अगेन या दोन्ही चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे.
'या' ठिकाणी चित्रपटांवर बंदी
सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 या दोन्ही चित्रपटांवर सौदी अरेबियामध्ये बंदी घालण्यात आल्याचं कारण समोर आलं आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, दोन्ही चित्रपटांमधील धार्मिक मुद्दा पाहता यावर बंदी घालण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सिंघम अगेन रामायणाचा अँगल आणि हिंदु-मुस्लिम भावना यांचा समावेश लक्षात घेता, हा चित्रपट सौदी अरेबियाने बॅन केला आहे.
चित्रपटांवर बंदी घालण्याचं कारण काय?
धार्मिक संघर्षामुळे सिंघम अगेन चित्रपटावर सौदी अरेबियामध्ये बंदी घालण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सौदी अरेबियामध्ये या चित्रपटावर हिंदू-मुस्लिम संघर्ष दाखविल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे, असं सांगण्यात येत आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' या चित्रपटावरही सौदी अरेबियामध्ये बंदी घालण्यात आली आहे. समलैंगिकतेमुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचा दावा केला जात आहे. कार्तिक आर्यनने चित्रपटात समलैंगिक संदर्भांचा वापर केला आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :