Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. शाहरुख सध्या त्याच्या जवान (Jawan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनेक जण या चित्रपटाचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. जवान चित्रपटामधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकताच एका तरुणीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ही तरुणी हॉस्पिटमध्ये जवान चित्रपटामधील 'चलेया' (Chaleya Song) या गाण्यावर डान्स करत आहे. या तरुणीच्या व्हिडीओवर शाहरुख खाननं प्रतिक्रिया दिली आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी ही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना चलेया या गाण्यावर डान्स करत आहे. या तरुणीच्या बाजूला सलाईनची बॉटल देखील दिसत आहे.  'जवान चित्रपटामधील चलेया गाण्यावर डान्स करणारी हॉस्पिटलमधील पेशंट, शाहरुख हा आनंद देतो.' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या तरुणीच्या व्हिडीओवर आता शाहरुखनं प्रतिक्रिया दिली आहे.


शाहरुखची रिअॅक्शन


शाहरुख खाननं  तरुणीच्या हॉस्पिटलमधील डान्स व्हिडीओला ट्विटरवर रिप्लाय दिला आहे त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "हे खूप छान आहे! धन्यवाद... लवकर बरे व्हा आणि चित्रपट पहा!!! दुसर्‍या डान्स व्हिडीओची वाट पाहत आहे पण तुम्ही हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर…. लव्ह यू!!" 


पाहा व्हिडीओ:






‘जवान’ हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा विजय सेतुपती, संजीता भट्टाचार्य, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक आणि आलिया कुरेशी रिद्धी डोगरा, सुनील ग्रोवर, मुकेश छाबरा, योगी बाबू आणि एजाज खान  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला.


जवान या चित्रपटानंतर शाहरुखचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


संबंधित बातम्या:


Atlee Kumar : ज्याला रंगावरून लोकांनी हिणवलं... त्यानेच बॉक्स ऑफिस गाजवलं; जाणून घ्या 'जवान'चा दिग्दर्शक ॲटली कुमारबद्दल...