सोना रमजानमुळे तू वाचली, नाहीतर..
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2016 08:19 AM (IST)
मुंबईः अभिनेता सलमान खानवर केलेल्या वक्तव्यावर गायिका सोना मोहपात्राला चांगलंच टिकेला तोंड द्यावं लागत आहे. सलमानच्या चाहत्यांकडून अश्लिल भाषेत शिवीगाळ होत, असून याचा त्रास होत आहे, असं सोनाने ट्विटरद्वारे म्हटलं आहे. सलमान तुझे चाहते आणि डिजीटल आर्मी अशा अश्लील भाषेत मेसेज करत आहे, आता तुला खरं अभिनेता झाल्यासारखं वाटतं असेल, असं सोनाने अशाच काही ट्विटला रिट्विट करताना म्हटलं आहे. सोनाने सलमानच्या शुटिंगनंतर बलात्कार झाल्यासारखं वाटत होतं, हे वक्तव्य केलं होतं, त्यानंतर सोनाने सलमानला उत्तर दिलं होतं. मात्र धर्मानेच मला आता वाचवलं असंही सोनाने म्हटलं आहे. https://twitter.com/sonamohapatra/status/746266257234657280