शाहरूख म्हणतो, ती खुपच सुंदर आहे
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2016 03:44 PM (IST)
मुंबई : सुपरस्टार शाहरूख खान त्याच्या आगामी चित्रपटातील सहकलाकार सुचित्रा कृष्णमूर्ती आणि चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची मुलगी कावेरी यांच्या आवाजाच्या प्रेमात पडला आहे. शेखर कपूर यांची मुलगी कावेरीने आज आपले पहिले रेकॉर्डेड गाणे रिलिज केले. फॅनस्टरने ट्विटरवर सुचित्रा कृष्णमूर्ती लिहिले आहे की, ''आपली मुले कशी मोठी झाली. तुम्ही माझ्यासोबतच करिअरची सुरूवात केली. हे विशेष आहे. तिला माझा अशीर्वाद आहे.'' शाहरूखने यानंतर शेखर कपूरचे अभिनंदन करून ती किती सुंदर असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. कावेरीच्या आवाजाचे दृतिक रोशन, अभिषेक बच्चन यांच्यासह शान आणि सोनू निगम यांनीही कौतुक केले आहे.