Sharda Rajan Iyengar:  70 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार (Sharda Rajan Iyengar) यांचे आज (14 जून) निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शारदा राजन अय्यंगार यांनी अनेट हिट गाणी गायली आहेत. 'तितली उडी' या गाण्यामुळे  शारदा राजन अय्यंगार  यांना विशेष लोकप्रियता मिळाली. शारदा राजन अय्यंगार यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 रोजी तामिळनाडूतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला.  शारदा यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


शारदा यांना 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जहाँ प्यार मिली'  (Jahan Pyar Miley) या चित्रपटामधील 'बात जरा है आपस की' (Baat Zara Hai Aapas Ki) या हिट गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.  


  तेहरानमधील (Tehran) एका कार्यक्रमातील शारदा यांचं गाणं निर्माते राज कपूर ( Raj Kapoor)  यांनी ऐकलं. त्यानंतर 1966 मधील सूरज या चित्रपटामधील 'तितली उडी'  या गाण्याची ऑफर शारदा यांना राज कपूर यांनी दिली होती. 


दिग्गजांसोबत केले काम


अनेक वर्ष शारदा यांनी शंकर जयकिशन (Shankar–Jaikishan) या जोडीसोबत काम केले आणि इंडस्ट्रीला अनेक हिट गाणी दिली. शारदा यांनी मोहम्मद रफी (Mohammad Rafi), आशा भोसले (Asha Bhosle), किशोर कुमार (Kishore Kumar), यशुदास (Yesudas), मुकेश (Mukesh) आणि सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले होते. त्यांनी  वैजयंतीमाला (Vyjayanthimala), सायरा बानू (Saira Banu), हेमा मालिनी (Hema Malini) , शर्मिला टागोर (Sharmila Tagore), मुमताज, रेखा (Rekha) आणि हेलन यांसारख्या अभिनेत्रींची गाणी गायली. शारदा यांनी गायलेली अनेक गाणी हिट ठरली होती.


शारदा (Sharda Rajan Iyengar) या पहिल्या भारतीय महिला गायिका होत्या ज्यांनी स्वतःचा पॉप अल्बम लॉन्च केला. 1971 मध्ये लाँच झालेल्या त्यांच्या अल्बमचे नाव Sizzlers असं होतं.


विविध भाषांमधील गाणी गायली


शारदा यांनी हिंदीशिवाय तेलुगू, मराठी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमधील गाणी गायली आहेत. त्यांचा गझल अल्बम 'अंदाज-ए-बयान' 2007 साली प्रसिद्ध झाला, जो मिर्झा गालिबच्या लोकप्रिय गझलांवर आधारित होता. लाजू नका मुळी मुलखाची मी भोळी, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट ही मराठी गाणी देखील शारदा यांनी गायली आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kazan Khan Passed Away : लोकप्रिय अभिनेते कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; आठ वर्षांपासून होते इंडस्ट्रीतून गायब