मुंबई : प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या लोणावळ्यातील बंद बंगल्याला हजारो रुपयांचं वीज बिल लावल्याने त्या थक्क झाल्या आहेत. बंगल्यात नोकर-चाकर आहेत, मात्र आपलं येणंजाणं फारच कमी असतानाही 65 हजारांच्या घरात बिल आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.


आशा भोसले यांनी आमदार आशिष शेलार यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवल्यानंतर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची हमी दिली आहे. त्याचप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावर बिल कसं आलं, हे शोधून काढण्याचीही खात्री दिली आहे.

संगणकीय बिलिंग पद्धतीत तांत्रिक चुकीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर बिल आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोणावळ्यातील तुंगार्ली लेक रोड परिसरात आशा भोसलेंचा बंगला आहे. मात्र या बंगल्यात फारशी वर्दळ नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.



सप्टेंबर महिन्याच्या बिलाची रक्कम 16 हजार 411 रुपये 84 पैसे इतकी दाखवण्यात आली आहे. तर 37 हजार 168 रुपये 35 पैशांची थकबाकी असल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.