Sidhu Moose Wala: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या (Sidhu Moose Wala) प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यामध्ये स्पेशल सेलच्या 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्पेशल सीपी एचजीएस धालीवाल, डीसीपी स्पेशल सेल मनीषी चंद्रा, डीसीपी राजीव रंजन यांच्यासाठी Y-श्रेणी सुरक्षा मंजूर करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) याबाबत माहिती दिली आहे.

सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन तासांनी लॉरेन्स टोळीच्या गोल्डी ब्रारने हत्येची जबाबदारी स्वीकारली.

स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांना मिळाली धमकीसिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांना धमकी मिळाली आहे. ज्यानंतर दिल्ली पोलिसांनी या आधिकाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लखबीर लांडा याने सोशल मीडियावर धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. 'तुम्ही जर रस्त्यावर दिसलात तर त्याचे परिणाम बरे होणार नाहीत', अशी धमकी लखबीर लांडानं दिल्याचं म्हटलं जात आहे.

स्पेशल सेलच्या आधिकाऱ्यांना त्यांनी पंजाबमध्ये जाऊ नये, अशी धमकी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी या अधिकाऱ्यांना सुरक्षा दिली आहे.

सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला हे ओळखले जायचे. सिद्धू मुसेवाला यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली होती. 29 मे 2022 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांचे 'वॉर' गाणं चाहत्यांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले मिलिअन व्ह्यूज!