Sidhu Moose Wala : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे 'वॉर' (Vaar) हे नवीन गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या यूट्यूब पेजवर हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. अल्पावधीतच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. एका तासात या गाण्याला दोन मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. 


29 मे 2022 रोजी सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचं हे दुसरं गाणं लॉंच करण्यात आलं आहे. हे गाणं महान शीख योद्धा हरिसिंह नलवा यांच्या आयुष्यावर बेतलेलं आहे. हरीसिंह नलवा हे शीख समाजाचे महान सेनापती होते. तसेच ते रणजित सिंह यांचे लष्करप्रमुखदेखील होते. त्यांनी अनेक युद्धे करून महाराज रणजित सिंह यांना विजय मिळवून दिला आहे. 


सिद्धू मुसेवाला यांचे 'वॉर' हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. सनेपीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. सिद्धू मुसेवाला यांचं मृत्यूनंतरचं पहिलं गाणं 'SYL' यूट्यूबने हटवलं आहे. सरकारने आक्षेप घेल्यामुळे हे गाणं यूट्यूबने हटवलं असल्याचं म्हटलं जात आहे. या गाण्यात शेतकरी आंदोलन, लाल किल्ला आणि पंजाब-हरियाणा अशा अनेक गोष्टींचा उल्लेख होता.


सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर तब्बल 26 दिवसांनी त्यांचे 'SYL' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. सिद्धू मूसेवालाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. दोन दिवसांतच या गाण्याला 27 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर 33 लाख लोकांनी सिद्धूच्या या गाण्याला आपली पसंती दर्शवली होती. सिद्धू मूसेवाला यांचे SYL हे गाणं यूट्यूबवर ट्रेंड करत होतं.  


दर 5 ते 6 महिन्यांनी एक गाणं रिलीज होणार!


सिद्धू मुसेवाला यांच्या अरदासच्या वेळी त्यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, दर 5-6 महिन्यांनी सिद्धूचे एक गाणं रिलीज करतील, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील 5-7 वर्षे रिलीज होत राहतील आणि ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.



 


संबंधित बातम्या


Sidhu Moose Wala Song: सिद्धू मूसेवालांचे ‘SYL’ गाणे रिलीज, काही वेळातच मिळाले मिलिअन व्ह्यूज!