Sidhu Moose Wala : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) अर्थात शुभदीप सिंग सिद्धू यांची आई गरोदर असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, मुसेवाला कुटुंब लवकरच आपल्या घरात नव्या पाहुण्याचे स्वागत करणार आहे. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. मुसेवालाची आई चरण कौर गरोदर असून लवकरच एक नवीन सदस्य त्यांच्या कुटुंबात सामील होणार असल्याचे वृत्तात सांगण्यात आले.
दिवंगत प्रसिद्ध गायक मुसेवाला यांनी 2022 मध्ये पंजाब विधानसभेची निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर मानसा येथून लढवली होती, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही. त्याच वर्षी 29 मे रोजी मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे पंजाबच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली होती.
पंजाबमधील श्रीमंत गायकांपैकी आहे एकदा मुसेवाला
पंजाबमधील अल्पावधीतच लोकप्रिय आणि श्रीमंत झालेल्या गायकांमध्ये सिद्धू मुसेवालाचा समावेश होतो. सिद्धू मुसेवालाच्या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्यानंतर त्याची काही गाणी रिलीज झाली होती. त्यांनाही लोकांनी तुफान प्रतिसाद दिला.
लवकरच होणार डिलीव्हरी
सिद्धू मुसेवाला हा आपल्या आई-वडिलांचा एकलुता एक मुलगा होता. सिद्धूच्या पालकांनी या गरोदरपणाच्या वृत्तावर कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, कुटुंबीयांशी निगडीत असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये सिद्धू मुसेवाला याची आई चरण कौर लवकरच बाळाला जन्म देऊ शकते.
मृत्यनंतरही गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत असलेला गायक
सिद्धू मुसेवाला यांनी गीतलेखनापासून त्यांच्या संगीतक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. गायनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना पुढे राजकारणापर्यंत घेऊन गेला. आपल्या गायकीच्या जोरावर सिद्धू मुसेवाला यांनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी तरुणाईला वेड लावले होते. आता मृत्यूनंतरही ते त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यांची गाणी आजही अनेक पार्ट्यांमध्ये किंवा लग्नसोहळ्यांत वाजवली जातात.