Sidhu Moose Wala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे संगीतक्षेत्रासह मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. आता सिद्धू मुसेवाला यांच्या जन्मदिनी न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर त्यांच्या गाण्यांचा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. गाण्यांचा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले होते. 


सिद्धू मुसेवाला यांना त्यांचा 29 वा वाढदिवस उत्साहात साजरा करायचा होता. त्यासाठी त्यांनी तयारीदेखील सुरू केली होती. पण त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. सिद्धू मुसेवाला यांचे जगभरात चाहते आहेत. न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवरील त्यांच्या गाण्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांनी न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. 




रातोरात झाले स्टार


सिद्धू मुसेवाला यांनी  गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'लायसेन्स' असे त्याच्या पहिल्या गाण्याचे नाव होते. हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. 'सो हाई' या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळाली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे सिद्धू रातोरात स्टार झाले. सिद्धू मुसेवाला यांच्या  'सो हाई' या गाण्याला यूट्यूबवर 477 मिलिअन व्हूयूज मिळाले आहेत. सिद्धू मुसेवाला यांच्या गाण्यात एक पंजाबी स्वॅग होता. सिद्धू मुसेवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू असे होते.  


सिद्धू मुसेवाला 2016 साली शिक्षणासाठी कॅनडात गेले होते.  सिद्धू मुसेवाला यांनी लुधियानाच्या गुरू नानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कॅनडात गेले. 2017 साली त्यांनी 'सो हाई' हे पहिले गाणे गायले. 


सिद्धू मुसेवाला यांचा जन्म कुठे झाला?


तरुणांचा आवडता गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांचा जन्म 11 जून 1993 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मुसा गावात झाला. एका पंजाबी कुटुंबात सिद्धू मुसेवाला जन्माला आले होते. सिद्धू मुसेवाला यांच्या गाण्यात एक पंजाबी स्वॅग होता. सिद्धू मुसेवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू असे होते.  


संबंधित बातम्या


Sidhu Moose wala Birthday: शुभदीप सिंह सिद्धूचा सिद्धू मुसेवाला बनण्यापर्यंतचा प्रवास! गाण्यांनी जिंकलं होतं प्रेक्षकांचं मन


Sidhu Moose Wala Case : इंटरपोलकडून गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी , सिद्धू मूसवालाच्या हत्येची स्वीकारली होती जबाबदारी