Sidharth Kiara Wedding Date: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani)  यांच्या अफेअरच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. या दोघांच्या नात्यांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे रिपोर्ट्सनुसार पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाला मोजक्याच नातेवाई आणि मित्रापरिवाराला आंत्रित करण्यात आल्याचं समजतेय. सिद्धार्थ अथवा कियारा यांच्याकडून लग्नाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण नुकतेच दोघांना प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या घरी जाताना पाहिले. त्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा उडायला सुरुवात झाली. 


लग्नाची तारीख आली समोर (Sidharth Kiara Wedding Date) -


ई-टाइम्सला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 6 फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहेत. हळदी, साखरपुडा, संगित यासारखे प्री-वेडिंग कार्यक्रम चार आणि पाच फेब्रुवारी रोजी होणार आहेत.  कियारा आणि सिद्धार्थ सहा फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील जैसलमेर पॅलेस हॉटलमध्ये सात फेरे घेणार आहेत. कडेकोठ सुरक्षाव्यवस्थेमध्ये लग्नाचं आयोजन करण्यात आले आहे. 


डेटिंगच्या बातम्या कधी आल्या? (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding)


'लस्ट स्टोरीज'च्या व्रॅपअप पार्टीत कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट झाली. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांनी 'शेरशाह' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले. त्याशिवाय 'कॉफी विथ करण 7' च्या मंचावर कियाराने त्यांच्या नात्याविषयी उघडपणे भाष्य केलं होतं. सिद्धार्थ आणि माझी मैत्री खास मित्रापेक्षा थोडी जास्त आहे, असं कियारा म्हणाली होती. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.



कियारा-सिद्धार्थचे आगामी सिनेमे 


कियाराचा 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) हा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे.  या सिनेमात ती विकी कौशलसोबत निगेटिव्ह रोलमध्ये होती. सध्या कियारा 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याशिवाय कियारा 'आरसी 15' (RC15) या चित्रपटात  राम चरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.   तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राचा 'मिशन मजनू' (Mission Majnu) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत 'पुष्पा: द राइज' फेम रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) प्रमुख भूमिकेत आहे. त्याशिवाय सध्या तो 'योद्धा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे.