Sheezan Khan Advocate : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येला शिझान खान (Sheezan Khan) जबाबदार असल्याचा आरोप शिझान खानवर लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशातच आता पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत, सर्व आरोप निराधार असल्याची माहिती शिझानच्या वकिलांनी दिली आहे. 


शिझानचे वकील म्हणाले,"पोलीस सतत शिझानची चौकशी करत आहेत. त्याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले असून पोलिसांकडे अद्याप कोणतेही पुरावे नाहीत. सर्व आरोप निराधार आहेत. मालिकेच्या सेटवरील एकाही व्यक्तीने आपल्या जबाबात शिझानविरोधात वक्तव्य केलेले नाही". 


वकील पुढे म्हणाले,"पोलिसांनी योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. पोलिसांनी पुरावे मिळाले तर त्यांनी योग्य ती कारवाई करावी. शिझान फक्त तुनिषासोबत रिलेशनमध्ये होता. इतर मुलींसोबत त्याचे संबंध नव्हते. तुनिषाच्या आईने शिझानवर अनेक चुकीचे आरोप लावले आहेत". 


शिझान खानच्या अडचणीत वाढ


अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) हा पोलीस कोठडीत आहे. आरोपी शिजान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते. शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 तारखेपर्यंत शिझान खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता  शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 डिसेंबरपर्यंत शिझानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
कोण आहे शिझान खान? 


शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान एक उत्कृष्ट अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.


 


संबंधित बातम्या


Tunisha Sharma Death Case : दुसऱ्या मुलीशी संबंध असताना तुनिषाशी जवळीक का वाढवली? तुनिषाच्या आईचा शिझानला सवाल