Siddharth Ray: 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. या चित्रपटामधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे (Siddharth Ray) यानं शंतनू ही भूमिका साकारली. सिद्धार्थनं मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात देखील काम केलं. सिद्धार्थनं चित्रपटष्टीमध्ये येण्यासाठी त्याचं नाव देखील बदललं होतं. जाणून घेऊयात सिद्धार्थच्या खऱ्या नावाबद्दल...


व्ही शांताराम यांच्या चित्रपटामधून केलं पदार्पण


1977 मध्ये रिलीज झालेल्या व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या चानी या चित्रपटामध्ये  सिद्धार्थ रे यानं काम केलं. 1980 च्या दरम्यान सिद्धार्थनं थोडी सी बेवफाई  या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.  


चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी बदललं नाव


सिद्धार्थ रे याचे खरे नाव हे सुशांत असे आहे. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सिद्धार्थने नाव बदललं.  थोडी सी बेवफाई  या चित्रपटानंतर गंगा का वचन, वंश, युद्धपथ, परवाने, बाजीगर, मिलिट्री राज, बिच्छू, पिता, जानी दुश्मन: एक अनोखी प्रेम कहानी या हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केलं.  जैत रे जैत या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं.बाजीगर या चित्रपटात सिद्धार्थ रेनं इस्पेक्टर करण ही भूमिका साकारली होती.


'अशी ही बनवाबनवी' मुळे मिळाली लोकप्रियता


'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात शंतनू ही भूमिका सिद्धार्थ रे यानं साकारली. हा चित्रपट 1988 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिद्धार्थ रेसोबतच या चित्रपटात अशोक सराफ,  सचिन पिळगावकर, प्रिया बेर्डे, सुधिर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी देखील काम केलं. 


शांतीप्रियासोबत बांधली लग्नगाठ


सिद्धार्थनं 1999 मध्ये अभिनेत्री शांतीप्रियासोबत लग्न केलं. शांतीप्रिया आणि सिद्धार्थ यांचे अफेअर बरीच वर्षे सुरु होतं, असं म्हटलं जाते. 1991 मध्ये शांतीप्रियानं अक्षय कुमारसोबत सौगंध या चित्रपटामध्ये काम केलं. या चित्रपटामधील बोल्ड सीनमुळे शांतीप्रिया ही चर्चेत होती. शांतीप्रिया आणि सिद्धार्थ यांच्या मुलाचं नाव शिष्या रे  असं आहे. 


हृदयविकाराच्या झटक्यानं झालं निधन


2004 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं सिद्धार्थचं निधन झालं. चरस: ए ज्वॉइंट हा सिद्धार्थचा शेवटचा चित्रपट 2004 मध्ये रिलीज झाला. सिद्धार्थच्या निधनानंतर शांतीप्रियानं तिच्या कुटुंबाचा उदर निर्वाह केला. शांतीप्रियानं काही मालिकांमध्ये देखील काम केलं.  


संबंधित बातम्या:


Ashi Hi Banwa Banwi: अशी ही बनवाबनवी चित्रपटाची 35 वर्षे; चित्रपटामधील हे डायलॉग्स आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात