Amazon Prime-Sajid Nadiadwala Deal : लवकरच बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. प्रेक्षक सध्या चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहण्यास पसंती देत आहेत. ओटीटी प्लॅटफोर्मवर चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने आता सर्व निर्माता आणि दिग्दर्शक त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित करत आहेत. सध्या अॅमेझॉनवर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाने नुकतीच अॅमेझॉनसोबत 250 कोटींची डील केला आहे.
250 कोटींची डीलसाजिद नाडियाडवालाने त्याच्या आगामी 5 चित्रपटांना अॅमेझॉनवर स्ट्रिम करण्यासाठी अॅमेझॉन कंपनीसोबत 250 कोटींची डील केली आहे. या डील नुसार बच्चन पांडे, किक-2 , हिरोपंती-2, कभी ईद कभी दिवाली आणि सत्यनारायण की कथा हे चित्रपट अॅमेझॉनवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने तर सलमान खानने किक-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच हिरोपंती-2 मध्ये टायगर श्रॉफ महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, सलमानसोबत किक-2 या चित्रपटाचे शूट करण्यासाठी साजिद उत्सुक आहे.
Shahrukh Khan Birthday : किंग खानचा 56 वा वाढदिवस; बादशाहाच्या 'मन्नत' बाबत या गोष्टी माहितेयत का?
बच्चन पांडेचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी बच्चन पांडे चित्रपटामधील अक्षय कुमारचा लूक रिलीज करण्यात आला होता. काळ्या रंगाची लुंगी, गळ्यात सोन्याची चैन आणि कपाळावर भस्म असा लूक बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षयचा असणार आहे. अक्षयचा या चित्रपटातील हटके लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. अक्षयने या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अजून बच्चन पांडे या चित्रपटाची रिलीज डेट प्रदर्शित झाली नाही.
Rohit Shetty New Project: Rohit Shetty च्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसून दिसून येणार Sidharth Malhotra