Siddharth Jadhav: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा विविध चित्रपटांमधून आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. सिद्धार्थ हा पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन देखील सिद्धार्थ करतो.  सिद्धार्थ हा त्याच्या लेकींसोबत लंडन ट्रीपला गेला आहे. तेथील फोटो आणि व्हिडीओ सिद्धार्थ सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतीच सिद्धार्थनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये त्यानं एका युझरच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. त्या नेटकऱ्यानं कमेंट करत सिद्धार्थला शिवी दिली आहे. 


सिद्धार्थनं इन्स्टाग्रामवर एका नेटकऱ्याच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला. या स्क्रिनशॉर्टमध्ये दिसत आहे की, त्या नेटकऱ्यानं सिद्धार्थला कमेंट करुन शिवी दिली. सिद्धार्थनं त्या नेटकऱ्याच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "ट्रोलिंग मान्य आहे... पण शिवी देणं कितपत योग्य आहे? 'Just a Thought"  सिद्धार्थच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 




सिद्धार्थ हा सध्या त्याच्या  स्वरा आणि इरा यांच्यासोबत लंडन ट्रीप एन्जोय करत आहे. सिद्धार्थ हा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. सिद्धार्थला इन्स्टाग्रामवर 747K फॉलोवर्स आहेत. सिद्धार्थ हा अनेक वेळा त्याच्या फंकी लूकमधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतो. 






सिद्धार्थचे चित्रपट


सिद्धार्थनं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन देखील सिद्धार्थ करतो. आपल्या हटके स्टाईलनं आणि नृत्यशैलीनं सिद्धार्थ प्रेक्षकांची मनं जिंकतो.  सिद्धार्थच्या  दे धक्का, जत्रा,  दे धक्का-2, टाइम प्लिज, लोच्या झाला रे या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. 


सिद्धार्थनं बॉलिवूडमध्ये केलं काम 


सिद्धार्थनं मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेता रणवीर सिंहसोबत सिद्धार्थन सिम्बा या चित्रपटामध्ये काम केलं. तसेच त्यानं रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटामध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच त्यानं रोहितच्या गोलमाल चित्रपटात देखील काम केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Siddarth Jadhav : 'जत्रा', 'दे धक्का' ते 'सिम्बा'; जाणून घ्या सिद्धार्थ जाधवचा आगामी सिनेमा कोणता?