जमशेदपूर : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेली अभिनेत्री श्वेता प्रसाद बासू लवकरच करण जोहरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. 'दैनिक भास्कर'च्या वृत्तानुसार, श्वेताने करण जोहराचा नवा सिनेमा साईन केला आहे. या सिनेमात तिच्यासह आलिया भट आणि वरुण धवन यांचाही सामावेश आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

 

सेक्स स्कँडलमध्ये नाव आलं होतं...

 

- साल 2014 मध्ये हैदराबादच्या बंजारा हिल्समधील एका सेक्स स्कँडलमध्ये श्वेता बासूचं नाव आलं होतं.

 

- दोन महिन्यात सुधारगृहात राहिल्यानंतर ती घरात परतली होती.

 

- मात्र हैदराबादच्या सत्र न्यायालयाने श्वेता बासूला या प्रकरणात क्लिन चिट दिली होती.

 

- जेलबाहेर आल्यानंतर स्पष्टीकरण देताना ती म्हणाली की, अशाप्रकारच्या कोणत्याही रॅकेटमध्ये  माझा समावेश नव्हता.

 

श्वेता 'मकडी'साठी राष्ट्रीय पुरस्कार

 

- 2002 मध्ये आलेल्या 'मकडी' सिनेमातील अभिनयासाठी श्वेता बासूला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

 

- त्यानंतर 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या इक्बालमधील श्वेताच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. यासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते.

 

- सिनेमासह श्वेताने कहानी घर-घर की आणि करिश्मा का करिश्मा यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला होता.

 

- याशिवाय राम गोपाल वर्माच्या डरना जरुरी है मध्येही श्वेता दिसली होती. यानंतर श्वेताने काही तेलुगू सिनेमांतही काम केलं होतं.