सचिनवरील सिनेमाचं पोस्टर रिलीज, सोशल साईट्सवर धुमाकूळ
एबीपी माझा वेब टीम | 11 Apr 2016 11:50 AM (IST)
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'सचिन ए बिलियन ड्रिम्स' या चित्रपटाच्या पोस्टरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सचिननं स्वत: या चित्रपटाचं पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं. सचिनच्या ट्विटनंतर अनेक दिग्गज क्रिकेटर्स आणि फिल्मस्टार्सनी या पोस्टरला शेअर करण्यास सुरुवात केली. यात शाहरुख खानसह, रोहित शर्मा, सुरेश रैना, वीरेंद्र सहवागचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील '200 नॉट आऊट' या प्रॉडक्शन कंपनीनं हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे. 14 एप्रिलला दुपारी एक वाजता या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला जाईल.