मी या क्षेत्रात वयाच्या 16 व्या वर्षांपासून आहे. माझ्या करिअरमध्ये सुरुवातीला साऊथच्या एका चित्रपटासाठी मला बिकिनी घालण्यासाठी सांगितलं गेलं. मी लगेचच यासाठी होकार दिला. हे कसं शूट केलं जाणार आहे? याची खरंच गरज आहे का? असा कुठलाही प्रश्न माझ्या मनात आला नाही. मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती हेच माझ्यासाठी महत्वाचं होतं, असं श्रुतीनं सांगितल्याचं या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र मराठी सिनेक्षेत्रात आल्यानंतर या बिकिनी लूकवरून मला खूप ट्रोल केलं गेलं. यामुळे स्वाभिमान दुखावला गेला असल्याचे देखील तिने सांगितल्याचं या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ही बातमी जुनी आहे. हे स्टेटमेंट मी तीन वर्षांपूर्वी केलं होतं. आता मला यावर काही बोलायचं नाही, असे श्रुतीनं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
हॉलिवूड, बॉलिवूड, टीव्ही आणि पत्रकारितेसह अनेक क्षेत्रातील महिलांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात #MeToo मोहिमेच्या अंतर्गत आवाज उठवला आहे. अनेक अभिनेत्रींनी याआधीही लैंगिक शोषण आणि कास्टिंग काऊचच्या बाबतीत खळबळजनक खुलासे केले आहेत.
श्रुती मराठेने अनेक मराठी चित्रपटांसह काही हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. टेलिव्हिजन मालिकांमधून देखील ती घराघरात पोहोचलेली आहे.
संबंधित बातम्या
#MeToo बाबत व्हॉट्सअॅपवर अश्लील पोस्ट, दोघांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
#MeToo चळवळीवर चित्रपट, बलात्काराचा आरोप असणारे आलोकनाथ न्यायाधीशाच्या भूमिकेत
#MeToo : संस्कारी बाबू आलोकनाथ यांच्यावर सहा महिन्यांची बंदी
#MeToo : लैंगिक शोषणाच्या आरोपावर राजकुमार हिरानी म्हणतात...
#MeToo : दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप
#MeToo : महिला आयोगाच्या नोटीसला नानांचं तीन पानी उत्तर | मुंबई | एबीपी माझा
#MeToo : महिला आयोगाच्या नोटीसला नानांचं तीन पानी उत्तर