मुंबई : अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे तिच्या मुंबई-चेन्नई फेऱ्या सुरु आहेत. पण बुधवारी श्रुती मुंबई विमानतळावर दिसली. श्रुती तिचा ब्रिटीश बॉयफ्रेण्ड मायकल कॉर्सेलीचं स्वागत करण्यासाठी मुंबईला आली होती.

श्रुतीसोबत क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी मायकल भारतात आला आहे. कारण आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे त्यांना एकमेकांना भेटायला फारसा वेळ मिळत नाही. भेटल्यावर मिठी मारताना दोघांचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला.



मायकल श्रुतीचे वडील आणि अभिनेता कमल हासन यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळी दोघांच्या लग्नाबाबत बातचीत होण्याची शक्यता आहे. परंतु श्रुतीने हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं.