मुंबई : दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील बेस्ट कपलपैकी मानलं जातं. पण काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. पण बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी आता एकत्र नाही, असं वृत्त आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्यात कोणताही वाद, तणाव नाही. फक्ता कामाच्या दबावामुळे दोघांमध्ये हळू हळू दुरावा आला आहे. इतकंच नाही तर रणवीरने तर नवी गर्लफ्रेण्डही शोधली आहे.

पाच वर्षांनी नातं तुटलं
दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह सुमारे पाच वर्ष एकत्र होते. यादरम्यान दोघांच्या साखरपुड्याचं वृत्तही आलं होतं. पण असं काय झालं की दोघांचं नातं तुटलं? दीपिका आणि रणवीरमध्ये कोणतीही कटूता नसल्याचं सांगितलं जात आहे. फक्त एकमेकांना वेळ न देता येत नसल्याने दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह दूर झाले.

रणवीर-दीपिकाच्या कुटुंबीयांची इच्छा
लवकरात लवकर लग्न करुन रणवीर सिंह संसार थाटायचा आहे, पण दीपिकाला करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. तसंच दोघे एकत्र राहावेत आणि त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचावं, अशी दीपिका आणि रणवीर सिंहच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. पण कदाचित रणवीर आता दीपिकाला स्पेस देऊन थकला आहे. त्यामुळे त्याने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.