Shrivalli English Version Video : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा द राइज' (Pushpa The Rise) या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाची जादू जगभर पाहायला मिळत आहे. सिनेमातील 'श्रीवल्ली' (Shrivalli) गाण्याने जगाला वेड लावले आहे. आता या गाण्याचे इंग्रजी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'श्रीवल्ली'चे इंग्रजी व्हर्जन डच गायिका एमा हीस्टर्सने (Emma Hesssters) गायले आहे. एमाने आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. 'श्रीवल्ली'च्या इंग्रजी व्हर्जनला युट्यूबवर आतापर्यंत 13 लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एमा हीस्टर्स सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती डच कलाकार असून युट्यूबवर तिचे 5.1 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत.
'श्रीवल्ली' गाण्याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. 'पुष्पा' सिनेमातील गाण्यांपासून ते डायलॉग्सपर्यंत सोशल मीडियावर रील्स पाहायला मिळत आहेत. रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुनच्या या सिनेमाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन महिने उलटले असले तरी पुष्पाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
'पुष्पा' चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी इतकी प्रसिद्ध होत आहेत की अनेक परदेशी सेलिब्रिटीही त्यावर व्हिडिओ बनवत आहेत आणि सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुनने पुष्पाची मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाने एसएस राजामौलीच्या 'बाहुबलीचा' रेकॉर्ड मोडला आहे. सिनेमाने हिंदींत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाकाळातदेखील अल्लू अर्जुनचे चाहते सिनेमा पाहण्यासाठी सिनेमाागृहात जात आहेत.
संबंधित बातम्या
Gehraiyaan Song : दीपिका पदुकोणच्या 'गेहरांईया' सिनेमातील 'बेकाबू' गाणे रिलीज
Kangana Ranaut : कंगना रनौतच्या वेब शोमध्ये होणार शहनाज गिलची एन्ट्री?
कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha