Stree 2 Movie Updates : राजकुमार राव  (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Sharaddha Kapoor) स्टारर हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री' 2018 साली रिलीज झाला होता. या हॉरर कॉमेडीपटाला प्रेक्षकांनी चांगला भरभरून प्रतिसाद दिला. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलचे 'स्त्री-2'चे (Stree 2) चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमात श्रद्धा कपूरसोबत आणखी एक अभिनेता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 


पाहुण्या कलाकाराने पूर्ण केले 'स्त्री 2'चे शूटिंग 


'बॉलिवूड हंगामा'च्या एका वृत्तानुसार, अभिनेता वरुण धवन हा स्त्री-2 मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वरुणने श्रद्धा कपूरसोबत छोट्या भूमिकेसाठीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.  वरुण 'स्त्री 2' मध्ये लांडग्याची  भूमिका साकारू शकतो. भेडिया चित्रपटात वरुणने  लांडग्याची व्यक्तीरेखा साकारली होती.  वरुणची भूमिका ही क्रॉसओव्हरचा एक भाग दाखवण्यात आला आहे. 'भेडिया-2' या चित्रपटातील वरुणच्या व्यक्तिरेखेची यातून पार्श्वभूमी दर्शवली जाणार असल्याची चर्चा आहे. वृत्तानुसार, वरुणने श्रद्धासोबत मुंबईतील एका स्टुडिओमध्ये  याचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. 


 






'भेडिया-2' चे चित्रीकरण हे पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये  सुरू होण्याची शक्यता आहे. स्त्री-2 ची कथा ज्या ठिकाणी संपते तिथून या भेडिया-2 चे चित्रीकरण सुरू होणार असल्याचे म्हटले जाते. सध्या  स्त्री-2 चे चित्रीकरण सुरू आहे. 


 






'स्त्री 2' कधी रिलीज होणार?


श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट स्त्री 2 बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट यावर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित 'स्त्री' सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. यानंतर, 2022 मध्ये वरुण धवनचा हॉरर कॉमेडी चित्रपट भेडिया आला, ज्यामध्ये क्रिती सेनन को-स्टार होती. हा चित्रपटही हिट ठरला होता.


राजकुमार राव (Rajkummar Rao), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) 'स्त्री' (Stree) या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं होते. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. त्यानंतर आता चित्रीकरण सुरू असून प्रेक्षकांना सरप्राइज मिळणार आहे.