Hanuman OTT Release : दिग्दर्शक प्रशांत वर्माचा सुपरहिरो आधारीत 'हनुमान' (Hanuman) चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अभिनेता  तेजा सज्जाची (Teja Sajja) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.या चित्रपटातील व्हीएफक्स (VFX)आणि इतर तांत्रिक बाबींचेही कौतुक झाले होते. थिएटरमध्ये कमाल दाखवल्यानंतर आता हनुमान चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.  


हनुमान चित्रपट 12 जानेवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा असताना चित्रपटाबद्दल अपडेट समोर आली आहे. 


कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज (Hanuman OTT Release Updates)


मोठ्या पडद्यावर जादू केल्यानंतर आता हनुमान चित्रपट ओटीटीवर  प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग म्हणजेच 'हनुमान'चे ओटीटी रिलीज पुढील महिन्यात केले जाऊ शकते. काही वृत्तांनुसार,  'हनुमान' चित्रपटाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ला विकले गेले आहेत. तेजा सज्जाचा हनुमान हा चित्रपट 2 मार्च 2024 रोजी OTT वर प्रदर्शित होऊ शकतो. सध्या, 'हनुमान'च्या ओटीटी रिलीज तारखेबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. पण ही बातमी समोर आल्यानंतर 'हनुमान'च्या ओटीटी रिलीजबद्दल चाहते खूप उत्सुक झाले आहेत. 






बॉक्स ऑफिसवर केली कमाई (Box Office Collection Of Hanuman)


तेजा सज्जाची भूमिका असलेला 'हनुमान' चित्रपट 11 भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या  चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.  बॉक्स ऑफिसवर 'हनुमान'ने जवळपास 194 कोटींची कमाई केली. तर, वर्ल्डवाइड हा आकडा 300 कोटींपर्यंतचा आहे.