फर्स्ट लूकमधील श्रद्धा हुबेहुब सायना सारखी दिसत आहे. या लूकमध्ये श्रद्धा हातात बॅडमिंटन रॅकेट घेऊन बॅडमिंटन कोर्टमध्ये उभी असल्याचे दिसून येत आहे. तसेच खेळाबद्दल असेललं तीचं प्रेम, भाव, जीद्द श्रद्धाच्य़ा चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते हे सायनावरील सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी 'तारे जमीं पर' या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले आहे.
या बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने खूप मेहनत घेतली आहे. श्रद्धा रोज सकाळी लवकर उठून बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेत. यावर ती म्हणते की, “या बायोपिकसाठी मी बॅडमिंटनचे 40 क्लासेस केले आहेत. बॅडमिंटन हा खेळ खूप कठीण आहे, पण मी खूप एन्जॉय करत आहे. तसेच सायनाचा जीवनप्रवास खूप इंटरेस्टिंग असल्याचेही श्रद्धाने सांगितले.”
स्वत:च्या आयुष्यावरील सिनेमाबाबत बोलताना सायना म्हणाली, "मला माहित होतं की, माझ्या आयुष्यावर सिनेमा बनवला जातो आहे. मात्र, माझी भूमिका कोण करत आहे, हे माहित नव्हतं. त्यामुळे श्रद्धा कपूर माझी भूमिका साकारणार असल्याचं कळल्यावर आनंद झाला आहे. श्रद्धा खूप सुंदर आणि मेहनती आहे. मला पूर्ण खात्री आहे की, श्रद्धा अत्यंत उत्तमपणे भूमिका साकारेल."
सायना पुढे म्हणाली, "आनंदाची बाब म्हणजे, श्रद्धा माझी जवळची मैत्रिण आहे. सिनेमात उपयोगी पडतील, अशा बॅडमिंटनबाबत तिला नक्की टिप्स देईन. अनेकांनी माझी स्तुती करताना म्हटलं आहे की, तू श्रद्धा कपूरसारखी दिसतेस. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे."
संबंधित बातम्या
अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार 'भारताची फुलराणी'