मुंबई : “ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी” हा परेश रावल यांचा आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. जम्मू काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित सिनेमा पुढच्या वर्षी 11 जानेवारीला रिलीज होणार आहे. उरी सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर दिसत आहेत.


उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता, ज्याला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या टीझरमध्ये भारताने उरी हल्ल्याचा बदला कसा घेतला ते दिसत आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे.

भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅम्पवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता, ज्यात भारताचे 19 जवान शहीद झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

या सर्जिकल स्ट्राईकवरच हा सिनेमा आहे, ज्याचं दिग्दर्शन आदित्य धार करत आहेत. सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

पाहा टीझर