Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यातदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा सिनेमा लवकरच 175 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 

Continues below advertisement

'भूल भुलैया 2' 175 कोटींच्या क्लबमध्ये सामिल

रिलीजच्या तिसऱ्या विकेंडलादेखील 'भूल भुलैया 2' चांगलाच गल्ला जमवत आहे. शनिवारी या सिनेमाने 3.01 कोटींची कमाई केली आहे. तर शुक्रवारी या सिनेमाने 1.56 कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 167.72 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे हा सिनेमा आता 175 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Continues below advertisement

‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा पहिल्या दिवसापासून रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. ‘भूल भुलैया 2’ने पहिल्या दिवशी 14.11 कोटी कमाई करत बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असून, तुफान वेगाने पुढे जात आहे. 'भूल भुलैया 2'च्या क्रेझसमोर कंगना रनौतचा ‘धाकड’ मात्र फिका पडला आहे. कंगनाचा बहुप्रतीक्षित ‘धाकड’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 

कार्तिक आणि कियारा यांचा हॉरर कॉमेडी सिनेमा ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा दुप्पट कामगिरी करत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल जात आहेत. कार्तिक आणि कियारादेखील त्यांच्या सिनेमाच्या यशामुळे खूप खुश आहेत. 

बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा दबदबा

कोरोना महामारीनंतर बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होऊ लागले. संजय लीला भंसाळी यांचा 'गंगूबाई काठियावाडी', विवेक अग्निहोत्रींचा 'द कश्मीर फाइल्स' आणि आता 'भूल भूलैया 2' हे सिनेमे चांगलेच सुपरहिट झाले आहेत. तर दुसरीकडे 'पुष्पा', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या दाक्षिणात्य सिनेमांनी चांगलाच गल्ला जमवला आहे.

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection: प्रेक्षकांवर दिसली ‘भूल भुलैया 2’ची जादू, तिसऱ्या आठवड्यात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

Kartik Aaryan : '500 रुपये दे कौतुक करतो'; मजेशीर कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला कार्तिक म्हणाला...