Shivpratap Garudjhep :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांच्या (Amol Kolhe ) 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep)  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील अमोल कोल्हेंच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. शिवप्रताप गरुझेप या चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. हा ट्रेलर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे. कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी ट्रेलरचं कौतुक केलं आहे. 


ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती 


ट्रेलरला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं या ट्रेलरला कमेंट केली,  'खूप जबरदस्त ट्रेलर आहे. आतुरता “5 ऑक्टोबर” ची' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ट्रेलर बघून अंगावर शहारे आले!' ट्रेलर पाहून अनेक प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला वंदन करून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर घेऊन आलो आहोत शिवप्रताप गरुडझेपचा उत्कंठावर्धक ट्रेलर! बघा, शेअर करा आणि विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर, 5 ऑक्टोबरला हा 'शिवप्रताप' अनुभवा फक्त चित्रपटगृहांत!' असं कॅप्शन या ट्रेलरला देण्यात आलं आहे. 


पाहा ट्रेलर :



'शिवछत्रपती' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकेमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. अमोल कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात येतं. आता 'शिवप्रताप-गरुडझेप' या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वतः डॉ. कोल्हे पुन्हा एकदा साकारणार आहेत. ही भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' हा चित्रपट 5 ऑक्टोबरला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटामधील 'बम बम भोले' हे गाणं रिलीज झाले होते. या गाण्यालाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. 


'शिवप्रताप-गरुडझेप' या चित्रपटाचं दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. तसेच, हा चित्रपट 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत असणार आहे. या चित्रपटात औरंगजेब ही भूमिका यतीन कार्येकर साकारणार आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: