Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या तो 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. शिव कुठेही गेला तरी त्याच्या आजूबाजूच्या लोकांना तो प्रभावित करत असतो. आता 'झलक दिखला जा 11'च्या मंचावर तो काय धमाका करणार याकडेस सर्वांचं लक्ष लागलं आहे.


'झलक दिखला जा'चा दुसरा आठवडा आता सुरू झाला आहे. त्यामुळे सर्वच स्पर्धक आपलं सर्वोत्तम देत खूप मेहनत घेत आहेत. याबद्दल बोलताना शिव म्हणाला,"आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आता सर्वोत्तम सादरीकरण करण्यावर माझा भर असेल. नशीबाने मला 'आरआरआर' (RRR) सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाणं मिळालं आहे. या गाण्याने भारताला ऑस्कर जिंकून दिलं आहे. आता परिक्षकांकडून मला 'रॉकस्टार' ही पदवी मिळाली आहे. तसेच मलायका आणि फराह या परिक्षकांनी प्रशंसाही केली आहे". 


कुटुंबियांसोबत वेळ घालवत शिवने केली 'झलक दिखला जा'ची तालीम


दिवाळीतीही शिवने कुटुंबियांसोबत वेळ घालवत 'झलक दिखला जा'ची तालीम केली आहे. दिवाळीत शिवने अमरावतीत कुटुंबियांसोबत वेळ घालवत झलकची तालीम करण्यासाठी वेळ काढत होते". 


शिव ठाकरे म्हणतो,"हा दिवाळीचा आठवडा होता आणि प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासह साजरा करत होता. मी माझ्या मुंबईच्या घरी एकटाच होतो. त्यामुळे मी एक दिवस माझ्या कुटुंबाला जाऊन भेटायचे ठरवले पण मी माझ्या कामा बरोबर फसवणूक पण करू शकत नाही म्हणून मी माझ्या रिहर्सल साठी अधिक वेळ दिला. दिवाळीच्या आदल्या रात्री मी माझी  रिहर्सल संपवली आणि माझ्या अमरावतीच्या फ्लाइटसाठी थेट विमानतळाकडे धाव घेतली. माझ्या आई-बाबा, आजी आणि सर्वांसोबत दिवाळीचा सुंदर दिवस घालवल्यानंतर, झलक दिखला जा एपिसोडच्या शूटिंगसाठी वेळेवर पोहोचण्यासाठी मी रात्री उशिरा ट्रेन पकडली".


किंग ऑफ रिअ‍ॅलिटी शो ते रॉकस्टार शिव ठाकरे!
 
आपला माणूस, मिस्टर अनस्टॉपेबल, किंग ऑफ रिअ‍ॅलिटी शो, प्रियजनांकडून रिअ‍ॅलिटी स्टार यासारख्या खिताब जिंकल्यानंतर, शिव ठाकरेने 'झलक दिखला जा'चे परिक्षक अर्शद वारसी यांच्याकडून 'रॉकस्टार'ची पदवी मिळाली आहे. 


संबंधित बातम्या


Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरेने कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी; पाहा फोटो