Nawab Malik VS Sameer Wankhede:  : जर मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर मी राजीनामा देईल आणि राजकारणातून संन्यास घेईल, असं अल्पसंख्यांक मंत्री  नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.  पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले की, क्रांती रेडकर आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना जीवाचा धोका असेल धमकी येत असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटावे.  मी ही मागणी करतो की अमित शाह यांनी वानखेडे यांच्या कुटुंबाला झेड सुरक्षा द्यावी, असंही मलिक म्हणाले. सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरले तर मी राजकारणातून संन्यास घेईल.  आणि ते खोटे ठरले तर किमान त्यांनी माफी मागावी.  त्यांची नोकरी तर जाणारच आहे, असंही ते म्हणाले. 


क्रूझ पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर


मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांचा 'सिलसिला' सुरुच आहे. आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी पुन्हा वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी म्हटलं आहे की, क्रूझ पार्टी प्रकरणात एक बाब समोर आली की या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर होता. त्याठिकाणी त्याची गर्लफ्रेंड देखील होती. बंदूक घेऊन तो दाढीवाला त्याठिकाणी होता. त्याची समीर वानखेडेंसोबत मैत्री आहे. गोव्यात देखील यांनी मोठे व्यवहार केले होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. आम्ही एनसीबीला सांगितलं होतं की एक दाढीवाला व्यक्ती होता. त्याची मैत्रीण देखील त्याठिकाणी होते. त्यांचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत आम्ही ते व्हिडिओ देऊ, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. आम्ही त्या चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. जर त्यांना दाढीवाला त्यांना मिळत नसेल त्याचे व्हिडिओ मिळत नसतील तर मी त्याचे पुरावे अधिकारी ज्ञानेंद्र सिंग यांना देईल. त्यांनी तसे पुरावे मागावेत, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.


नवाब मलिकांचा नवा दावा, समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' केला जाहीर, वानखेडेंच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटोही ट्वीट


मालदीवच्या पार्टीची माहिती घेण्यात यावी


मलिक यांनी म्हटलं आहे की,  आमची मागणी आहे समीर वानखेडे यांचं, गोसावी, प्रभाकर आणि समीर वानखेडे यांचा ड्रायव्हर माने यांचा सीडीआर रिपोर्ट काढण्यात यावा. मी आत्ताचं एनसीबी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही कारण एनसीबी कदाचित आपल्यापेक्षा चार पावले पुढे चालत असेल. आणखी एक बाब म्हणजे मागच्या एक वर्षापासून एक प्रकरण पेंडिंग आहे. दीपिका पदुकोण, साराअली खान, श्रद्धा कपूर यांना केवळ व्हॉट्सएपच्या चॅटच्या माध्यमातून बोलावण्यात आले होते. मात्र त्यांना अटक केली नाही. त्यामुळे वानखेडेच्या मालदीवच्या पार्टीची माहिती घेण्यात यावी. कोण कोण तिथं होतं याची माहिती घ्या, असं त्यांनी म्हटलं आहे. 


मलिक यांनी म्हटलं आहे की,  माध्यमासोबत बोलत असताना काल मी एक एनसीबीच्या अज्ञात व्यक्तीकडून एक पत्र आलं होतं. ते मी दिल्लीला एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलं होतं. त्यांनतर दुपारी आम्ही याची चौकशी करू असं म्हटलं. मात्र संध्याकाळी पुन्हा त्यांनी त्यांचं म्हणणं बदललं. यावरून आता असं स्पष्ट होऊ लागलं आहे की संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे, असं मलिकांनी म्हटलं आहे.


खरा जन्मदाखला वानखेडेंनी सादर करावा


मलिक म्हणाले की, मी बोललो होतो की 6 महिन्यात त्यांची नोकरी जाणार आहे. कारण तसे पुरावे आहेत. वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन आयआरएसचं पद घेतलं आहे. त्यांनी एका दलित मुलाचा अधिकार घेतला आहे.  मी ज्यावेळी जन्मदाखला टाकला त्यावेळी हा खोटा आहे असा आरोप करण्यात आला मग खरा कुठं आहे,तो वानखेडे यांनी सादर करावा, असं त्यांनी म्हटलं आहे. सर्वांचे ऑनलाइन सर्टिफिकेट दिसते मात्र केवळ समीर वानखेडे यांचा मात्र जन्मदाखला दिसत नाही. आपण जर बारकाव्याने पाहिलं तर त्यामध्ये लक्षात येईल की एका बाजूला दुसरं नाव लिहिण्यात आले आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.


मलिक यांनी म्हटलं आहे की, ज्यावेळी धर्म बदलण्यात येतो त्यावेळी त्याला त्याचे लाभ बंद होतात. खासकरून मुस्लिम धर्मात ही बाब आहे. त्यामूळे खोटे कागदपत्रे सादर करून वानखडे यांनी नोकरी घेतली आहे. अनेक दलित संघटना समोर येऊन मला ही कागदपत्र मागत आहेत. मी त्यांना हे कागदपत्रे देणार आहे, असं ते म्हणाले.


Nawab Malik Allegations: एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून कुटुंबाची वंशावळचं जारी..


मलिकांकडून ट्वीट करत वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत दावे


आज सकाळी सकाळी नवाब मलिकांनी पुन्हा ट्वीट करत वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत काही दावे केले आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, गुरुवार 7 डिसेंबर 2006 रोजी रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि सबाना कुरेशी यांच्यात लोखंड वाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) मुंबई येथे निकाह पार पडला. मेहेरची रक्कम रु.33000 होती. साक्षीदार क्रमांक 2 हा समीर दाऊद वानखेडेची मोठी बहीण यास्मिन दाऊद वानखेडेचा अजिज खान पती होता, असा दावा मलिकांनी केला आहे. सोबतच दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेंचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नाही.  ज्या फसव्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे आहे, असं मलिकांनी म्हटलंय.