Celebs Reaction On Covishield Vaccine Side Effects: सध्या कोरोना लस कोविशिल्डच्या दुष्परिणामांबाबतच्या (Covishield Vaccine Side Effects) बातम्या समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या लसीचा दुष्परिणाम होऊ शकतो अशी कबुली अॅस्ट्राझेनका या कंपनीने दिल्यानंतर लोकांच्या मनात एक प्रकारची भीती बसली आहे. काही लोकांनी हा दावा थोटा असल्याचे म्हटले. तर, काही तज्ज्ञांच्या मते फार कमी साईड इफेक्ट होऊ शकतात. या सगळ्या गदारोळात बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
श्रेयस तळपदे
श्रेयस तळपदेला गेल्या वर्षी १४ डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आला होता. नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान त्याने हृदयविकाराच्या झटक्याशी कोरोना लसीचा संबंध नाही हे नाकारू शकत नाही, असे म्हटले. हृदयविकाराच्या झटक्याला लसही कारणीभूत ठरली असू शकते असेही त्याने म्हटले.
बादशाह
गायक बादशाहने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने मजेशीर कॅप्शन दिली आहे. मला वाटलं मी को-वॅक्सीन घेतली आहे असे वाटत होते. मात्र, लशीच्या प्रमाणपत्रावर कोविशिल्डचे नाव दिसले. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला मैनू विदो करो.. हे गाणं वाजत आहे.
रश्मी देसाई
अभिनेत्री रश्मी देसाईने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर तिने म्हटले की, ''आता घाबरून जायचं नाही, टांगती तलवार तर अजूनही आहे.''
गौहर खान
गौहर खानने देखील या गंभीर विषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गौहर खानने 'हे ईश्वर' अशी प्रतिक्रिया दिली आहे.