OTT High Paid Actor : कोरोना महामारीमध्ये सिनेमागृहाला टाळं लागलं आणि प्रेक्षकांची पाऊले ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळली. सिनेमागृहात ज्यांचे चित्रपट फ्लॉप ठरत होते त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मने एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. अनेक नवोदित कलाकारांना ओटीटी प्लॅटफॉर्मने रातोरात सुपरस्टार केलं. ओटीटीची वाढती क्रेझ पाहता बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार्स ओटीटीकडे वळले. कोरोना महामारीनंतर ओटीटीची लोकप्रियता आणखी वाढली आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार्स आता ओटीटीकडे वळले आहेत. तर दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मने अनेक कलाकारांना स्टार बनवलं आहे. पण ओटीटीवरचा सर्वात महागडा अभिनेता कोण? जाणून घ्या...


दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma) : अभिनेता दिव्येंदु शर्माने 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याला खरी ओळख ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मिळाली. 'मिर्झापुर'मधील त्याने साकारलेली मुन्ना भैय्याची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर अनेक वेबसीरिजमध्ये तो झळकला. आज तो ओटीटीवरचा स्टार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिव्येंदु एका वेबसीरिजसाठी 5 लाख रुपये मानधन घेतो. 


जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) : 'मुन्ना जज्बाती'च्या माध्यमातून जितेंद्र कुमारने 2013 मध्ये ओटीटीवर पदार्पण केलं. टीवीएफच्या व्हिडीओमध्ये तो दिसून येतो. ओटीटीने जितेंद्र कुमारला चांगलीच लोकप्रियता दिली आहे. जीतू भैय्याच्या माध्यमातून त्याला लोकप्रियता मिळाली. 'पंचायत'सारख्या सुपरहिट वेबसीरिजच्या माध्यमातून जितेंद्र कुमार स्टार झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जितेंद्र कुमार एका एपिसोडचे 50 ते 80 हजार मानधन घेतो. 


अजय देवगन (Ajay Devgn) : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने 2022 मध्ये 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस'च्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं. सहा एपिसोडच्या या सीरिजमधील अजयचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. अजय देवगन या सीरिजमध्ये ईशा देओलसोबत दिसून आला होता. या सीरिजमधील प्रत्येक एपिसोडसाठी अजयने 18 कोटी रुपये चार्ज केले आहेत. अशाप्रकारे अजय देवगन भारतातील सर्वात महागडा ओटीटी स्टार आहे. अजय देवगनची एकूण संपत्ती 427 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो 30 ते 40 कोटी रुपयांचं मानधन घेतो. अजयप्रमाणे मनोज बाजपेयी आणि पंकज त्रिपाठीदेखील महागडे अभिनेते आहेत. अजय देवगनचे 'दे दे प्यार दे 2','गोलमाल 5','रेड 2' आणि 'औरों में कहाँ दम था' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. लवकरच हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 


संबंधित बातम्या


OTT Release This Week : 'हीरामंडी' आणि 'शैतान'नंतर 'या' आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 'हे' धमाकेदार चित्रपट अन् वेब सीरिज'; तुम्ही काय पाहणार?