Shehnaaz Gill Video:  ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) आता लाखोंच्या हृदयाची धडकन बनली आहे. शहनाज जेव्हा 'बिग बॉस 13' मध्ये आली, तेव्हा तिची ओळख फक्त पंजाबपुरती मर्यादित होती. पण, आता ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. इतकंच नाही तर, सोशल मीडियावर अभिनेत्रीचा प्रत्येक नवीन फोटो आणि व्हिडीओही धुमाकूळ घालत असतो. दरम्यान, शहनाजने आता तिचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती समुद्रकिनारी धमाल करताना दिसत आहे. या व्हिडीओवर तिचे चाहते भरभरून लाईक्स करत आहेत.


या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाच्या ग्राफिक्स टीशर्टमध्ये सना खूपच क्यूट दिसत आहे. शहनाजने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, 'बघा अजून चंद्र नाही, तरीही इतकं पाणी आलंय, यांना सूर्य आकर्षित करतोय का?, मी ऐकलं होतं की, चंद्र पाण्याला आकर्षित करतो, मला वाटतं की मीच पाण्याला आकर्षित करत आहे. या व्हिडीओमधील तिचा अंदाज सगळ्यांनाच भुरळ घालत आहे.


पाहा व्हिडीओ :



सोशल मीडियावर व्हायरल!


शहनाज गिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही मिनिटांतच या व्हिडीओला इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. यावर कमेंट करत अभिनेत्री जॉर्जिया अन्द्रानी म्हणते, 'टेक इट इझी चांदनी'.  त्यानंतर एका चाहत्याने लिहिले की, 'सदैव अशीच हसत राहा!’. आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘खूप सुंदर आणि दर्जेदार, शहनाज गिल द क्वीन ऑफ हार्ट्स.’


शहनाज लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार!


आता शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. ती सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' अर्थात ‘भाईजान’ या चित्रपटात दिसणार आहे. काही काळापूर्वी, चित्रपटाच्या सेटवरून अभिनेत्रीचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता, ज्यामध्ये शहनाज पारंपारिक पोशाख परिधान करून, तिच्या केसांमध्ये गजरा माळून सेटवर जाताना दिसली होती. या चित्रपटात सलमान आणि शहनाजशिवाय पूजा हेगडे, जस्सी गिल, राघव जुयाल आणि व्यंकटेश दग्गुबाती दिसणार आहेत. हा चित्रपट 31 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.


संबंधित बातम्या


Kabhi Eid Kabhi Diwali : ‘कभी ईद कभी दिवाली’च्या शूटिंगला सुरुवात; सलमानच्या लूकने चाहत्यांना लावले वेड


Shehnaaz Gill : सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मधील शहनाज गिलचा लूक व्हायरल, ‘या’ अवतारात दिसणार अभिनेत्री!