Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणी आता शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीन अर्जावर 11 जानेवारी 2023 रोजी सुनावणी होणार आहे. 


आज शिझानच्या वकिलांनी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. यात शिझान-तुनिषाचे इन्स्टाग्राम पोस्ट, त्याचे संबंध, तुनिषा आणि आईचे असलेले नाराजीचे संबंध तसेच वालीव पोलिसांनी कलम 306 हे चुकीचे कलम शिझानवर लावल्याचा युक्तीवाद अशा अनेक विषयांना हात घातला. 






तुनिषा अली नामक एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचा आरोप शिझानच्या वकिलांनी न्यायालयात केला. जवळपास पाऊण तास हा युक्तीवाद चालला. दरम्यान शिझानच्या वकिलांनी जामिन अर्जासाठी अनेक सेलिब्रिटींचे दाखलेदेखील दिले. 


आता शिझानच्या वकिलाच्या युक्तिवादावर अभ्यास करण्यासाठी तुनिषाच्या सरकारी वकिलांनी दोन दिवसाची मुदत मागितली आहे. त्यावर न्यायालयानं तुनिषाच्या वकिलांना आपली बाजू मांडण्यासाठी 11 जानेवारी ही तारीख दिली. त्यामुळे आता 11 जानेवारीला तुनिषाच्या वतीने बाजू मांडण्यात येईल. 


नेमकं प्रकरण काय? 


हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मानं शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तुनिशा आणि शिजान हे दोघं सध्या सब टीव्हीच्या अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.


संबंधित बातम्या


Tunisha Sharma Case: "तुनिषाला वाचवता आलं असतं, पण..."; तुनिषाची आई वनिता शर्मा यांचा शीझान खानवर गंभीर आरोप