Anuj Thakare On Bigg Boss Marathi Seoson 4 Winner Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4 Winner) पर्वाचा विजेता अक्षय केळकर (Akshay kelkar) खूप मेहनती आहे. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्ण करण्याची धमक अक्षयमध्ये आहे. एबीपी माझाला (Abp Majha) दिलेल्या मुलाखतीत अक्षयचा खास मित्र अनुज ठाकरे (Anuj Thakare) म्हणाला,"अक्षय माझ्यासाठी दागिना आहे". 


अनुज ठाकरे आणि अक्षयची मैत्री गेल्या आठ वर्षांपासून आहे. यावर भाष्य करताना अनुज म्हणाला,"अक्षय आणि माझी खूपच चांगली मैत्री आहे. एकांकिकेदरम्यान आमची ओळख झाली. पुढे आम्ही अंधेरीत एका म्हाडाच्या खोलीत राहायला गेली. जवळपास चार-पाच वर्ष आम्ही एकत्र राहत होतो. एका ताटात जेवण्यापासून ते प्रत्येक सिनेमा एकत्र पाहण्यापर्यंत अनेक गोष्टी आम्ही एकत्र केल्या आहेत. कोणताही प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आम्ही एकमेकांसोबत खूप चर्चा करायचो. प्रोजेक्ट घेण्यापासून ते त्या पात्राचा अभ्यास करण्यापर्यंत आम्ही सर्व गोष्टींवर चर्चा करायचो. आज आम्ही वेगळं राहत असलो तरी आमची मैत्री कायम आहे. 


अनुज पुढे म्हणाला,"अक्षय माझ्यासाठी काहीही करायला तयार असतो. मी कोणतं काम घ्यावं कोणतं घेऊ नये अशा अनेक गोष्टींसाठी अक्षय मला सल्ले जर कधी चूक झाली तर अक्षय ती चूक समजून सांगायचा. अक्षय खूप स्पष्टवक्ता आहे. एखादा मुद्दा पटवण्याची धमक अक्षयमध्ये आहे. अक्षय माघार घेणारा व्यक्ती नाही. अक्षय माझा मित्र असण्यासोबत एक उत्तम सल्लागार आहे. 


अक्षयचे वडील रिक्षा चालक आहेत. त्याच्यावर कुटुंबियांचे चांगले संस्कार आहेत. पण कुटुंबियांपेक्षा तो पूर्णपणे वेगळा आहे. अक्षयचा त्याच्या कामावर, वागण्यावर, बोलण्यावर, विचारांवर खूप विश्वास आहे. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर तो ती पूर्ण करतोच. 


आधी रडला, खचला मग झळकला


एका मराठी मालिकेसाठी अक्षयला विचारणा झाली होती. या मालिकेत अक्षय मुख्य भूमिकेत होता. या मालिकेचे प्रोमोदेखील आऊट झाले होते. पण कोणतंही कारण न देता अक्षयला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यावेळी अक्षय खूप खचला होता. प्रमुख भूमिका असलेली अक्षयची ही पहिलीच मालिका होती. त्यानंतर अक्षयने खूप मेहनत घ्यायला सुरुवात झाली. त्यानंतर त्याला थेट हिंदी मालिका मिळाली. दोन हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्यानंतर अक्षयने आता 'मराठी बिग बॉस' गाजवला आहे.


अनुज ठाकरे म्हणाला,"बिग बॉस मराठी'चं पहिलं पर्व आलं तेव्हा आम्ही दारं-खिडक्या बंद करून 'बिग बॉस' बघायचो. त्यावेळी अक्षयने मनातदेखील आणलं नसेल की 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात तो सहभागी होईल आणि त्या पर्वाचा महाविजेता ठरेल. अक्षय 'बिग बॉस'चा मोठा चाहता होता. त्यामुळे आम्ही कार्यक्रम पाहताना त्यावर चर्चादेखील करायचो". 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4: रिक्षा चालकाचा मुलगा ते 'बिग बॉस'चा विजेता; Akshay Kelkar वडिलांच्या रिक्षातूनच पोहचला होता सेटवर