मुंबई: देशाला हादरवून सोडणाऱ्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर आता वेब सीरिज बनणार आहे. शीना बोरा हत्याकांडांनंतर एका कुटुंबाच्या गुंतागुंतीच्या नात्याच्या जाळ्यात सारा देश अडकल्यासारखा वाटत होता. आता त्याच प्रकरणावर एक वेब सीरिज येणार असून 'एक थी शीना बोरा' या संजय सिंह यांच्या पुस्तकावर ती आधारित असणार आहे.
सन 2015 साली घडलेल्या शीना बोरा हत्याकांडानंतर अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. या हत्याकांडातील आरोपींशी निगडीत असलेल्या राजकारमणी, पोलिस अधिकारी आणि नातेसंबंधाचे जाळे समोर आलं. हे प्रकरण संजय सिंह यांनी कव्हर केलं होतं. त्यांनी यावर पुस्तकही लिहिलं होतं.
लेखक संजय सिंग हे सुप्रसिद्ध शोधपत्रकार आहेत. त्यांनी अनेक न्यूज चॅनेलवर काम केले आहे आणि हजारो कोटींच्या तेलगी बनावट मुद्रांक घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचं कामही त्यांनी केलंय. त्याआधी 'Scam2003: The Telgi Story' नावाची वेब-सिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. ती तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यावरील संजय सिंह यांच्या पुस्तकावर आधारित आहे. Sony Liv OTT वर त्याचं लवकरच स्ट्रिमिंग सुरू होईल. राकेश त्रिवेदी यांच्या सहकार्याने लिहिलेल्या आणि दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या 'वर्ल्ड बुक फेअर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'CIU: Criminals in Uniform' या पुस्तकावर गेल्या महिन्यात वेब-सिरीज जाहीर करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.
ही बातमी वाचा: