करिनाचं बाळ मुंबईतच जन्मणार, सासूबाईंनी ठणकावलं
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2016 12:58 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांच्या बाळाची चाहूल खान कुटुंबासोबतच त्यांच्या चाहत्यांनाही लागली आहे. एकीकडे करिना आणि सैफ लंडनमध्ये बाळाला जन्म देण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, मात्र आपलं नातवंड मुंबईतच जन्मणार असल्याचं करिनाच्या सासूबाई, प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ठणकावून सांगितलं आहे. आमचं कुटुंब मुंबईत राहतं, मुंबईत काम करतं. मुंबईत घर असताना परदेशात जाऊन बाळंतपण करण्याचा मूर्खपणा कोण का करेल. त्यामुळे करिनाचं बाळंतपण परदेशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शर्मिला टागोर यांनी सांगितलं. करिनाच्या प्रेग्नन्सीबाबत शर्मिला यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. पुन्हा एकदा आजी होण्याचा आनंद अवर्णनीय आहे. खान कुटुंबासोबत आपण जल्लोषात आनंद साजरा करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. डिसेंबरमध्ये करिनाच्या घरी नवा पाहुणा येण्याचा अंदाज आहे.