Sharad Ponkshe : अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे विविध मराठी चित्रपट,  मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. सध्या ते 'दार उघड बये' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.  शरद पोंक्षे सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील त्यांची मतं ते सोशल मीडियावर मांडतात. नुकतीच शरद पोंक्षे यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


शरद पोंक्षे यांची पोस्ट



शरद पोंक्षे यांनी भिडे गुरुजींसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये अभिनेत्री राधिका देशपांडे देखील दिसत आहे. या फोटोला त्यांना कॅप्शन दिलं, 'आज मिरजेत व्याख्यान आहे तेव्हा सकाळी सांगलीत मा.भिडेगुरूजींना भेटण्याचा योग आला. ते तरुणांकडून व्यायाम व मारूतीची ऊपायना सुर्यनमस्कार करून घेत होते.छ शिवाजीमहाराज तरूणांना समजाऊन सांगण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे मा भिडे गुरूजी अशी माणसं आहेत म्हणून हिंदू धर्माचं कार्य सुरू आहे.'






शरद पोंक्षे हे  विनायक दामोदर सावरकर यांचे विचार त्यांच्या व्याख्यानामधून मांडत असतात. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शरद पोंक्षे हे व्याख्यान देतात.  बीड,नाशिक यांसारख्या विविध शहरात त्यांनी व्याख्यान दिलं आहे. आज विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ते पुण्यात व्यख्यान देणार आहेत.  याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. 


शरद पोंक्षे यांच्या मालिका



शरद पोंक्षे यांनी स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. तसेच, त्यांनी ‘उंच माझा झोका’, ‘असे हे कन्यादान’, ‘राधा ही बावरी’ अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांचं दुसरे वादळ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. सध्या शरद हे  'दार उघड बये' या मालिकेत रावसाहेब नानासाहेब नगरकर ही भूमिका साकारत आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या:


Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंची नवी पोस्ट; म्हणाले, 'हिंदूंनो जागे व्हा'