Shah Rukh Khan Shared New Parliament Video : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने संसद भवनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शाहरुखने "नव्या भारतासाठी नवीन संसद भवन. पण भारताच्या गौरवाचे स्वप्न जुनेच", असे म्हटले आहे.


संसदेच्या नव्या भवनाचा व्हिडीओ ट्वीट करत शाहरुख खानने लिहिलं आहे,"आपल्या संविधानाचे समर्थन करणाऱ्या, या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि विविधतेचे रक्षण करणाऱ्या प्रत्येकासाठी हे नवीन संसद भवन आहे. नव्या भारतासाठी नवीन संसद भवन. पण भारताच्या गौरवाचे स्वप्न जुनेच. जय हिंद! माझे संसद भवन माझा अभिमान". 






शाहरुखने शेअर केलेल्या दीड मिनिटांच्या व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे,"भारताचे नवीन संसद भवन. आपल्या स्वप्नातलं घर, 140 कोटी भारतीयांचं घर. या घरात देशातील वेगवेगळ्या राज्यातील, गावातील, शहरातील सर्व जाती-धर्मातील मंडळी एकत्र नांदतील. सत्यमेव जयतेचा नारा नसून विश्वास असायला हवा. हत्ती-घोडे, सिंह आणि अशोक चक्राचा स्तंभ हा लोगो नसून आपला इतिहास असावा".


हेमा मालिनीनेदेखील शेअर केला व्हिडीओ


हेमा मालिनी (Hema Malini) यांनीदेखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या म्हणत आहेत,"संसदेची नवी इमारत ही ही देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे".






नवीन संसद भवनाचे वैशिष्ट्य काय आहे? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन करत आहेत. 971 कोटी रुपयांत नव्या संसद भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. 888 लोकसभा आणि 300 राज्यसभा सदस्यांसाठीचं हे संसद भवन आहे.  


संबंधित बातम्या


New Parliament Inauguration LIVE Updates: आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन, विरोधकांचा मात्र उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार; जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...