Shantit Kranti 2 Trailer: शांतीत क्रांती या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता 'शांतीत क्रांती' चा दुसरा सीझन (Shantit Kranti 2) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. शांतीत क्रांती सीझन 2 चा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि ट्वीस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, श्रेयस हा त्याच्या मित्रांना त्याच्या लग्नाची माहिती देतो. त्यानंतर श्रेयस हा त्याच्या मित्रांसोबत बॅचलर ट्रिपला जाण्याचा निर्णय घेतो.श्रेयस, प्रसन्न आणि दिनार हे तिघेही बॅचलर ट्रिपसाठी निघतात पण त्यांनी 6 दिवसांच्या तीर्थयात्रेवर जाण्यासाठी बस बुक केलेली असते. याबाबत समजल्यानंतर तीन मित्रांची उडालेली तारांबळ ही शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे.
शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजमध्ये ललित प्रभाकरने (Lalit Prabhakar) प्रसन्न ही भूमिका साकारली आहे तर दिनार ही भूमिका अलोक राजवडेनं साकारली आहे. तसेच या वेब सीरिजमधील श्रेयस ही भूमिका अभय महाजन यानं साकारली आहे.
ललित प्रभाकरने शांतीत क्रांती सीझन 2 या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं,'मंडळी तुमचे आवडते त्रिकुट परत येतंय तुमच्या भेटीला आणि ते पण डब्बल मज्जा आणि मस्ती सकट. आता हा प्रवास होणार आहे अजून धमाकेदार. तर तयार रहा एक कडक प्रवासा साठी!'
पाहा ट्रेलर:
'शांतीत क्रांती सीझन 2' ची स्टार कास्ट
भडिपासह सहयोगाने टीव्हीएफची निर्मिती आणि अरूनभ कुमारद्वारे निर्मित शांतीत क्रांती सीझन 2 चे दिग्दर्शन सारंग साठ्ये आणि पौला मॅकग्लीन यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 'शांतीत क्रांती 2 ही वेब सीरिज 13 ऑक्टोबरपासून सोनी लिव्ह या अॅपवर स्ट्रीम होणार आहे.
संबंधित बातम्या: