मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांची मुलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणं हे काही नवीन नाही. अशातच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने एका मॅगझिनसाठी केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत आहे. वोग (VOGUE) या फॅशन मॅगझिनसाठी सुहाना खानने फोटोशूट केलं आहे.

वोगच्या कव्हर पेजवर सुहानाचा फोटो झळकला असून शाहरुखनेच आपल्या मुलीला लॉन्च केलं आहे. सुहानाचा फोटो असणारे वोग मॅगझिन हातात घेत शाहरुखने वोगच्या कव्हर पेजचा फोटो ट्विटरवर शेअर केला.

वोगचे आभार मानत शाहरुख खानने आपल्या मुलीसाठी एक भावनिक ट्वीटही केलं आहे.


गौरी खाननेही मुलगी सुहानाचा फोटो शेअर करत वोग मॅगझिनचे आभार मानले. सुहाना खानने वोगसाठी केलेल्या फोटोशूटमधील दोन फोटो सध्या समोर आले आहेत.


‘ही सुरुवात आहे नव्या युगाची, भेटा सुहाना खानला,’ असं म्हणत वोग मॅगझिनने इंस्टाग्रामवर आपला कव्हर फोटो शेअर केला.


दरम्यान, सुहाना खान लवकरच सिनेमातही पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. करण जोहर तिला आपल्या सिनेमात लॉन्च करणार असल्याची माहिती आहे.