मुंबई: मल्टिप्लेक्समध्ये आजपासून तुम्हाला बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहे. शिवाय मल्टिप्लेक्सच्या आवारात मिळणारे खाद्यपदार्थही छापील किंमतीतच मिळतील. सरकारकडून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. जे मल्टिप्लेक्स हे आदेश पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.


हायकोर्टाने वारंवार प्रश्न उपस्थित करुनही थिएटरमधील खाद्य पदार्थांच्या मनमानी किमती कमी होत नव्हत्या. शिवाय मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी थिएटर कर्माचऱ्यांना मारहाणही केली होती. त्यानंतर हा मुद्दा राज्यभर गाजला होता.

कोथरुड सिटी प्राईडमधील दर

पुण्यातील कोथरुड सिटी प्राईड या मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किमती आजपासून काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. या चित्रपटगृहात 200 रुपयांना मिळणारे पॉपकॉर्न आता 100 रुपयात, 80 रुपयात मिळणारे समोसे 60 रुपयात, 80 रुपयांना मिळणारी कॉफी 60 रुपयात मिळणार आहे.

दरम्यान चित्रपटगृहांच्या मनमनिविरोधात ज्यांनी आंदोलन केले ते मनसेचे कार्यकर्तेही चित्रपटगृहावर बारिक लक्ष ठेऊन आहेत. नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवणार असल्याचे मनसेचे पुण्यातील पदाधिकरी किशोर शिंदे यांनी सांगितले.

हायकोर्टाचा निर्णय 

मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही? पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला? असा सावल करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरलं. बॉम्बे पोलिस अॅक्टनुसार थिएटर मालकांवर करवाई करता येईल का? याचा तपशील सादर करा असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.  5 रुपयांचे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये 250 रुपयांत का?: हायकोर्ट 

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही- राज्य सरकार

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. जर मल्टिप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी घालत असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारने 13 जुलैला विधीमंडळात स्पष्ट केलं.

राज्यातील विविध महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर त्यावर कारवाई करण्याच्या संबंधी गृह विभाग सहा आठवड्यांच्या आत धोरण ठरविणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

संबंधित बातम्या 

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही- राज्य सरकार 

मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाकडून राज ठाकरेंच्या या 9 अटी मान्य  

मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये प्रेेक्षकांची कशी होते लूट?  

माझा विशेष : मल्टीप्लेक्समधील तोडफोडीची जबाबदारी कोणाची?  

5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का? पुण्यात मनसैनिकांची थिएटर मॅनेजरला मारहाण  

मल्टिप्लेक्समध्ये सरसकट खाद्यपदार्थांवर बंदी घालणार का? : हायकोर्ट  

थिएटरमध्ये बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई कायदेशीर कशी? : कोर्ट  

चित्रपटाचं तिकीट 200 पेक्षा जास्त नाही, कर्नाटक सरकारचे आदेश