मी लग्नासाठी उतावीळ आहे: सलमान खान
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2016 10:21 AM (IST)
मुंबई: सुपरस्टार सलमान खाननं आपल्या लग्नाबाबत एक जबरदस्त वक्तव्य केलं आहे. 'मी लग्न करण्यासाठी उतावीळ आहे.' कथित प्रेमिका लुलिया वंतूरसोबत लग्नाच्या प्रश्नाला बगल देत सलमाननं असं उत्तर दिलं आहे. सलमान म्हणतो की, 'मला कायमच लग्नबंधनात अडकायचं होतं. पण मला नेहमीच 'समोरुन होकाराची वाट' पाहावी लागली.' 50 वर्षीय सलमान रियालिटी शो सारेगमपा मध्ये 'सुल्तान'च्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी स्पर्धक जगप्रीत बाजवानं त्याला त्याच्या जीवनसाथीविषयी प्रश्न विचारला. टीव्ही शोद्वार जारी करण्यात आलेल्या स्टेटमेन्टनुसार सलमान म्हणाला की, 'जगप्रीत तू चुकीच्या माणसाला निशाणा बनंवलं आहे. मी याबाबतीत नेहमीच गमनशबी राहिलो आहे. पण याबाबतीत माझ्याविषयी लोकांची धारणा फारच चुकीची आहे.' सलमान मस्करीत म्हणाला की, 'खरं तर मी लग्नासाठी उतावीळ आहे. पण मला नेहमीच समोरुन होकाराची वाट पाहावी लागते. पुरुषांना याबाबतीत काहीही करावं लागत नाही. महिलाच असतात ज्या सारं काही ठरवतात.' शोमध्ये मेन्टॉरची भूमिका निभावणारा गायक मिका सिंह यावेळी म्हणाला की, 'मी सलमानचा मोठा चाहता आहे. मी त्याच्या पावलावर पाऊल ठेवतो. जेव्हा भाई लग्न करेल त्याच वर्षी मी देखील लग्न करेन.' हा विशेष भाग 26 जूनवला को टीव्हीवर प्रसारित होईल.