मुंबई: नोएडामधील आम्रपाली बिल्डरने अनेक ग्राहकांना वेळेवर घर न दिल्यानं या कंपनीचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर महेंद्रसिंह धोनी मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर याबाबत मोठ्याप्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या दरम्यान बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शाहरुखनं कॅप्टन कूल धोनीचा बचाव करताना शाहरुख म्हणाला की, 'ब्रॅण्डची जाहिरात करणारे सेलिब्रेटी हे जबाबदार नाहीत. मात्र, जाहिरात करण्याआधी सेलिब्रेटींनी कंपनीच्या प्रोडक्टबाबत खात्री करुन घेतली पाहिजे.'
कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना सेलिब्रिटींनी त्या उत्पादनाची खात्री करून घेणं गरजेचं आहे.. पण उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत सेलिब्रिटींना जबाबदार धरता येणार नाही, असा बचावात्मक पवित्रा शाहरूखनं घेतला आहे.
उत्पादनात काही अपायकारक गोष्टी आढळल्यास ती जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीला पाच वर्षांची शिक्षा आणि 50 लाखांच्या दंडाची शिफारस एका संसदिय समितीनं केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार लवकरच हे ग्राहक संरक्षण विधेयक संसदेत मांडण्यात येईल.