हिंदी सिनेसृष्टीत पंजबी गाण्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण पंजाबी भाषिकांसह इतर भाषिकांनाही गुणगुणायला लावणारे शब्द पंजाबीत आहेत. गेल्या नऊ-दहा वर्षात तर बहुतेक सिनेमांमध्ये एकतरी पंजाबी गाणं आहेच, असे दिसून येते. याच पंजाबी गाण्यावर आता एक खास सिनेमाच येऊ घातला आहे.
पंजाबी गाण्यांवर आधारित या सिनेमाचं ‘उडता पंजाब’ नाव असून अभिषेक चौबेंनी दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमात बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे.
https://twitter.com/shahidkapoor/status/719772584674463744
या सिनेमात शाहिद कपूर पंजाबी रॉकस्टारच्या भूमिकेत असून टॉमी सिंह असं त्याचं नाव आहे. ‘जब वी मेट’ या सिनेमात शाहिद पंजाबी मुलाच्या भूमिकेत दिसला होता. पंजाबी भाषेवर शाहिदची चांगली पकडही आहे. त्यामुळे या सिनेमातील शाहिदची भूमिका पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
‘उडता पंजाब’ सिनेमात शाहिदसोबत अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट, दलजीत दोशांज मुख्य भूमिकेत असणार आहेत. मल्टीस्टार सिनेमा म्हणूनही या सिनेमाकडे पाहता येईल. पंजाबी गाण्यांचा तडका आणि त्यासोबत गंभीर विषय हे या सिनेमाचं वैशिट्य आहे.
सिनेमा 17 जूनला रिलीज होणार असून अभिषेक चौबे यांनी दिग्दर्शित केला आहे. फँटम प्रॉडक्शन हाऊस आणि बालाजी मोशनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
‘जब वी मेट’ सिनेमानंतर शाहिद-करिना ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पाहा व्हिडीओ :