मुंबई : बॉलिवू़ड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षीत 'सुलतान' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये पैलवान बनलेल्या सलमानचा दबंग अंदाज दिसत आहे.


 

या चित्रपटात सलमान खानची भूमिका अतिशय दमदार आहे. सुलतान प्रतिस्पर्धी पैलवानाला धोबीपछाड देत पुन्हा एक हरियाणा केसरी झाल्याचं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

Photo Courtesy : YRF Video

दरम्यान, सलमानने सोमवारीच ट्विटरवर सुलतानचं पोस्टर रिलीज करुन सुलतान का पहला दांव, असं लिहिलं होतं.

 

हा सिनेमा प्रसिद्ध पैलवान सुलतान अली खानच्या आयुष्यावर आधारित आहे. आदित्य चोप्राने चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे. यंदा ईदला 'सुलतान' प्रदर्शित होणार आहे.

 

पाहा व्हिडीओ