शाहिद-मीराच्या घरी अवतरली नन्ही परी!
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2016 03:56 PM (IST)
मुंबई : अभिनेता शाहिद कपूरच्या घरी नन्ही परी अवतरली आहे. शाहिदची पत्नी मीराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मीराला गुरुवारी संध्याकाळी खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज संध्याकाळी तिने मुलीला जन्म दिला. बाळाचं वजन 2.8 किलो असून दोघेही सुखरुप असल्याचं कळतं. दोनच दिवसांपूर्वी शाहिदने मीरासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. जबाबदार पिता बनण्याची तयारी करत असल्याचं शाहिदने यावेळी म्हटलं होतं. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह 7 जुलै, 2015 रोजी झाला होता.