न्यूयॉर्क: फोर्ब्स मासिकाने 2016 मध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या जगातील टॉप 20 अभिनेत्यांची यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान, बीग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे. या यादीत WWE स्टार ड्वेन जॉनसन म्हणजे 'द रॉक' अव्वल स्थानी आहे.


 

या यादीत आठव्या स्थानी शाहरूख खान असून, त्याने या वर्षी 3.3 कोटी डॉलर मानधन घेतले. याच स्थानी त्याच्यासोबत अयर्न मॅन डाउनी ज्यूनिअर हाही आहे. शाहरूखच्या संदर्भात लिहताना फोर्ब्सने बॉलिवूड आणि बॉक्स ऑफिसवर आपली बादशाही शाहरूखने कायम राखल्याचे म्हणले आहे. शाहरूखने अनेक ब्रॉण्डच्या माध्यमातूनही कमाई होते.

 

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारने या यादीत दहाव्या स्थानी मजल मारली आहे. त्याने या वर्षभरात 3.15 कोटी डॉलर मानधन घेतले. त्याच्यासोबत हॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध चेहरा ब्रॅण्ड पिटही आहे. फोर्ब्सच्या मते अक्षय आपल्या हिट चित्रपटांमुळे चांगली कमाई करत आहे. याशिवाय तो हॉलिवूडच्या तुलनेत सर्वाधिक ब्रॅण्डची जाहिरात करतो, त्या माध्यमातूनही त्याच्या कमाईत वाढ होत आहे.

 

या यादीत बॉलिवूडच्या दबंग खान सलमानला 14 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने वर्षभरात 2.85 कोटी डॉलरची कमाई केली. मासिकाने सलमानचे कौतुक करताना त्याच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा उल्लेख करून टोमणाही मारला आहे.

 

या यादीत महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव 18 व्या क्रमांकावर आहे. अमिताभ बच्चन यांनी दोन कोटी डॉलर्सची कमाई केली. फोर्ब्सने अमिताभ बच्चन यांचा गौरव करताना 73 वर्षीय अभिनेते आजही कामात व्यस्त असतात, असे म्हणले आहे. तसेच त्यांनी गेल्या पाच दशकांत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवताना 150 पेक्षा जास्त चित्रपटांत प्रमुख भूमिका निभावल्याचेही सांगितले.

 

टॉप 20 अभिनेत्यांची यादी

 

1). ड्वेन जॉनसन (द रॉक) 6.4 कोटी डॉलर

2). जॅकी चेन 6.1 कोटी डॉलर

3). मॅट डेमोन 5.5 कोटी डॉलर

4). टॉम क्रूज 5.3 कोटी डॉलर

5). जॉनी डेप 4.8 कोटी डॉलर

6). बेन एफ्लेक 4.3 कोटी डॉलर

7). विन डीजल 3.5 कोटी डॉलर

8). शाहरूख खान 3.3 कोटी डॉलर

8). रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर 3.3. कोटी डॉलर

10). अक्षय कुमार 3.1 कोटी डॉलर

10). ब्रॅण्ड पिट 3.1 कोटी डॉलर

12). अॅडम सॅड्लर 3 कोटी डॉलर

12) मार्क वाह्लबर्ग 3 कोटी डॉलर

14). सलमान खान 2.8 कोटी डॉलर

15). लियोनार्डो डिकैप्रियो 2.7 कोटी डॉलर

16). क्रिस प्रॅट 2.6 कोटी डॉलर

17). विल स्मिथ 2.5 कोटी डॉलर

18). अमिताभ बच्चन 2 कोटी डॉलर

19). मॅथ्यू मॅक्कनॉगी 1.8 कोटी डॉलर

20). हॅरिसन फोर्ड 1.5 कोटी डॉलर